स्टोरी

कृषी मित्र शेतकरी गटाची विषमुक्त शेतीकडे वाटचाल!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नाटळ येथील “कृषीमित्र शेतकरी” गटाने विषमुक्त शेतीकडे एक भक्कम पाऊल टाकत फार्मर कप २०२६ अंतर्गत उत्स्फूर्त सहभागातून, खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात दशपर्णी अर्क तयार केला.विशेष म्हणजे यावेळी रात्री १० वाजता कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री उमाकांत पाटील उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना फार्मर कप २०२६ स्पर्धेमध्ये एकत्रित निविष्ठा खरेदी, शेतीच्या सुधारीत पद्धती, तसेच विषमुक्त शेतीचे महत्त्व आणि फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. तेव्हा,पाठबळ आणि मार्गदर्शनासाठी शासन आपल्या दारी आलेलं पाहून शेतकरी गटाला एक नव चैतन्य, नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा मिळाली. गटात आनंदाच वातावरण तयार झालं.या गटाने स्मार्ट शेती ॲपमध्ये देखील दशपर्णी अर्क उपक्रमाची नोंद करून तब्बल अडीच मार्क मिळवले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून विषमुक्त शेतीच्या दिशेने गटाची वाटचाल अधिक मजबूत होत असल्याचे दिसून आले.


Spread the love

Related posts

भगव्या आतंकवादा’ला स्थापित करण्याचे षड्यंत्र विफल, UAPA न्यायालयाकडून रद्द !

news

ओटवणे गावचे सुपुत्र वैभव कुमार जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

news

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

news

Leave a Comment