Uncategorized

मसूरेतील पावणाई महिला बचत गटाच्या वतीने वीर जवानांना ५०० राख्या भेट…

Spread the love

 

पावणाई महिला बचत गटाचा आदर्श उपक्रम…. तहसीलदार वर्षा झालटे

 

मालवण प्रतिनिधी:

 

पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट मसुरे गडघेरा बाजारपेठ या महिला बचत गटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांना राखीतून मानवंदना देण्यासाठी बचत गटांने स्वतः तयार केलेल्या ५०० राख्या सीमेवरील सैनिकांसाठी भेट म्हणून मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्याकडे सोमवारी सकाळी मालवण तहसीलदार कार्यालय येथे जाऊन या बचत गटाच्या सदस्या तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर आणि बचत गट सदस्य सौ विजेता पारकर यांनी सुपूर्द केल्यात. पावनाई महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांनी बोलताना सांगितले की बचत गटांच्या माध्यमातून आज विविध उत्पादने घेऊन रोजगार निर्माण केला जातो परंतु त्या पुढे जाऊन सामाजिक जाणीवेतून आणि वीर जवानांन प्रति आदर भावना आणि प्रेम व्यक्त करणारा पावणाई महिला बचत गटाचा आजचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. मसूरे येथील हा बचत गट नेहमी समाजाभिमुख विविध उपक्रम राबवत असतो. या बचत गटाचे आज तालुक्यामध्ये खूप मोठे नाव आहे याबद्दल या बचत गटातील सर्व सदस्यांचे सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

या महिला बचत गटामध्ये अध्यक्ष हेमलता दूखंडे,सचिव ज्योती पेडणेकर, नीलम दळवी, शितल मसुरकर, सुरेखा परब, मोनिका दुखंडे, मनीषा शिंदे, शाकीरा शेख, नूरजहा शेख या महिला कार्यरत असतात..


Spread the love

Related posts

आत्मज्ञान…

news

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी! नितीन गडकरी…

news

रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर – मूननकर यांचा ‘महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मान…

news

Leave a Comment