Uncategorized

आनंद नेवगी नियोजन सभापती झाल्यावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची गुरुकुल येथे भेट घेऊन घेतला आशीर्वाद.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नुकतीच सभापती निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी यांची जलनिसरण व नियोजन सभापती पदी बिनविरोध निवड झाली. आज सायंकाळी त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेऊ त्यांचा आशीर्वाद घेतला त्याप्रसंगी साळगावकर यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिला व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महामंडळ आयोग जिल्हा समन्वय सिंधुदुर्ग नारायण सावंत तसेच राजा शिवाजी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते अभय पंडित,अशोक पेडणेकर, मनोज घाटकर, इप्तिकार राजगुरू, उमेश खटावकर, शिवम सावंत, मयूर लाखे, कादर गवंडी, धीरज गावडे व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा

news

महाशिवरात्री रोजी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील दिनक्रमात बदल.

प्रसाद परब

देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित!

news

Leave a Comment