स्टोरी

अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !

Spread the love

लव्ह जिहादचे नाव न घेता कायद्यामध्ये ‘ओळख लपवून केलेला विवाह गुन्हा असेल’, असा उल्लेख; किमान १० वर्षांची होणार शिक्षा !

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ब्रिटीशकालीन कायदे रहित केले जाणार असून त्यांच्याऐवजी जनतेला दंडित करणारे नव्हे, तर न्याय देणारे कायदे आणण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ११ ऑगस्ट या दिवशी लोकसभेत दिली. यानुषंगाने मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या संदर्भात अत्यंत कठोर कायदे बनवण्यात येण्याचे सुतोवाचही शहा यांनी केले आहे. स्वत:ची ओळख म्हणजेच *धर्म लपवून कुणा महिलेशी विवाह केल्याच्या दोषी पुरुषाला कठोर शिक्षा केली जाईल*, असेही शहा म्हणाले. १. सध्या लव्ह जिहादने देशभरात थैमान घातले आहे. या दृष्टीने केंद्रशासन आणत असलेल्या या कायद्यामुळे लव्ह जिहादवर आळा बसण्यास साहाय्य होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये स्वत:ची ओळख लपवून नोकरी अथवा पदोन्नती देण्याच्या नावाखाली विवाह केल्यास त्यावरही शिक्षेचे प्रावधान असणार आहे.

 

२. सध्या कुणा महिलेशी विवाह करण्याचे कारण देत लैंगिक संबंध प्रस्थापित करणार्‍याला बलात्काराचा गुन्हा म्हणता येत नाही; परंतु नव्या कायद्यामध्ये यावर प्रावधान असेल. यामध्ये किमान १० वर्षांच्या शिक्षेसह दंडही ठोठावला जाईल.

 

३. ‘भारतीय दंड विधान, १८६०’च्या ऐवजी येणार असलेले ‘भारतीय न्याय संहिता २०२३’मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कायदे असणार आहेत.

 

महिलांवरील अत्याचारांवर एवढी होणार शिक्षा !

बलात्कार: बलात्कार्‍याला किमान १० वर्षांच्या कारावासापासून आजीवन कारावासाची शिक्षा !

सामूहिक बलात्कार: सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी किमान २० वर्षांची शिक्षा

बलात्कारानंतर महिलेचा मृत्यू: बलात्कारानंतर महिलेचा मृत्यू झाला अथवा ती पुष्कळ वेळ बेशुद्धावस्थेत राहिली, तर दोषीला २० वर्षांच्या शिक्षेपासून आजीवन कारावास आणि प्रसंगी फाशीची शिक्षा !

१२ वर्षांपेक्षा अल्प मुलीवर बलात्कार: हाच नियम १२ वर्षे वयापेक्षा लहान असलेल्या मुलीवर बलात्कार केल्यास असणार !


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील उत्सवाला संतांची वंदनिय उपस्थिती

news

सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती!

news

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शिवनेरी बसचा अपघात!

news

Leave a Comment