स्टोरी

गगनबावडा येथे लक्झरी दरडीवर आढळून तीन प्रवासी गंभीर

Spread the love



जखमीना कोल्हापूर येथे उपचारासाठी केले दाखल

वैभववाडी: –करूळ घाटाच्या सुरुवातीला गगनबावडा हद्दीत लक्झरी बस दरडीवर आढळून झालेल्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच गगनबावडा आणि वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित प्रवाशांना एसटी बसने गोवा येथे पाठविले आहे. ही बस पुणे ते गोव्याला जात होती. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

जखमींमध्ये शिल्पा महेंद्र अनाधन 44, गीता राजेंद्र अनाधन, 50 पिंकल नितीन 35 सर्व राहणार सुरत गुजरात येथील रहिवाशी असून गोवा येथे फिरायला जात होती. पुणे ते गोवा या खाजगी बसने प्रवास करत असताना घाटाच्या सुरुवातीलाच ड्रायव्हरचा अचानक ताबा सुटून अपघात झाला. त्यामुळे त्यांना अधिक उपचार साठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार ग्रस्त मुलांसाठी १५ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे मोफत तपासणी शिबीर.

news

अयोध्येतील राम मूर्तीच्या प्रतिष्ठापने वेळी कणकवलीत विविध कार्यक्रम होणार.

news

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी…!

news

Leave a Comment