Uncategorized

तज्ञ क्रीडाशिक्षक शैलेश नाईक यांची पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्या वतीने नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित तयार करण्यात येणाऱ्या इयत्ता ६वीच्या आरोग्य व शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तक लेखनासाठी कोकण विभागातून निवड करण्यात आलेले एकमेव व्यक्तिमत्व आहे. 2005 पासून बदलत्या आरोग्य व शारीरिक शिक्षणच्या अभ्यासक्रमात तज्ञ राज्य मार्गदर्शक, अभ्यास मंडळ सदस्य, लेखन मंडळ सदस्य म्हणून आजपर्यंत त्यांची कारकीर्द राहिली आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील एक तज्ञ मार्गदर्शक म्हणून उभ्या महाराष्ट्र त्यांची ओळख आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने इयत्ता अकरावी बारावी या इयत्ता साठी आरोग्य व शारीरिक शिक्षण क्रमिक पुस्तकांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

त्यांनी आजपर्यंत हॉकी, अथलेटिक्स, कबड्डी या खेळामध्ये शंभरहून अधिक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. ते स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कबड्डी पुरुष वरिष्ठ गटाचे संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले आहे. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख जिल्ह्याला आहे. राणी पर्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी 30 वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून तर दोन वर्ष दोडामार्ग इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज दोडामार्ग येथे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

हॉकी व कब्बडी या खेळाचे ते राष्ट्रीय पंच आहेत. त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल सर्व थरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.सावंतवाडी मधील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल या ठिकाणी अथलेटिक्स क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम पाहतात.


Spread the love

Related posts

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी! नितीन गडकरी…

news

तर जीभ हसडून टाकू… एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!..

news

आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही…! नगराध्यक्ष – श्रद्धा लखमसावंत भोसलें

प्रसाद परब

Leave a Comment