स्टोरी

घाडीगावकर समाजाच्यावतीने वार्षिक गुणगौरव!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना करियरसाठी संगणकाशिवाय अन्य अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांकडे असतेच आणि त्यामधूनच ते आपली योग्य ती दिशा निवडत असतात.विद्यार्थी हा संगणकीय क्षेत्राचा गुरु आहे असे मत एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मुंबई येथील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. अनुराधा पोतदार यांनी मुंबई येथे व्यक्त केले.

क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाच्या व मध्य मुंबई विभागाच्या संयुक्त वतीने मुंबईतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुलांना मैदानी खेळ आणि मराठी भाषेतील शुद्धलेखन ही आज काळाची गरज आहे. मराठीमध्ये शिकूनही देशाचे राष्ट्रपती होता येतं असं मत घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष घनश्याम गावकर हे होते. यावेळी अध्यक्षांनी आपण आपल्या खडतर प्रयत्नाने आजही शिक्षण घेत असून याचा बोध समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत घाडी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार घाडीगावकर यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर समाजाचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर उपस्थित होते या कार्यक्रमा वेळी संपूर्ण मुंबईतील घाडीगावकर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तीने खेळांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत अशा विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त विध्यार्थी,समाज बांधव वकील, नोटरी व सीए झाले यांचा सुद्धा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास घाडीगावकर तर आभार प्रदर्शन रामचंद्र यशवंत घाडी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दर्शना घाडी, संदीप घाडी, मोहन कुळकर, संतोष घाडीगावकर व आर्या घाडीगावकर यांनी विशेष प्रयत्न केले.


Spread the love

Related posts

महाराष्‍ट्र प्रिव्‍हेन्‍शन ऑफ कट प्रॅक्‍टिस’, हा कायदा सुधारित स्‍वरूपात त्‍वरित लागू करावा,

news

कोलगाव काजर कोंड येथील रस्ता पाणंद खुली करून मिळावी.! सुबोध दाभोलकर

प्रसाद परब

७ नोव्हेंबर रोजी मसुरेत खुली ग्रुप डान्स आणि निमंत्रितांची एकेरी नृत्य स्पर्धा…

news

Leave a Comment