राजकारण

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा होणार..!

Spread the love

२४ फेब्रुवारी वार्ता: आज मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा होणार आहे. यामध्ये आगामी २०२९ च्या निवडणुका लक्षात घेऊन मोठ्या फेरबदलांची चिन्हे आहेत. अशी माहिती मिळत आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे लक्ष्य समोर ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी यावेळी अनेक तरुण आणि नव्या चेहऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. रविंद्र चव्हाण यांची गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे ही घोषणा तब्बल ८ महिने लांबणीवर पडली होती. प्रदेश भाजपने पाठवलेली संभाव्य नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाने दोनवेळा परत पाठवली होती. त्यात काही महत्त्वाचे बदल सुचवल्यानंतर आता अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. सत्तेत असूनही पक्ष संघटनेतील नियुक्त्या रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम होता, तो या घोषणेमुळे दूर होण्याचे संकेत आहेत.


Spread the love

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा प्रकरण चांगलेच तापले! मुख्यमंत्री संतापले

news

युवासेनेचा झंझावात विनायकजी राऊत साहेब यांनाच पुन्हा करणार खासदार…! युवासेनेचा निर्धार.

news

थोड्याच वेळात स्पष्ट होणार जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण?

news

Leave a Comment