स्टोरी

एअर इंडिया चे बोईंग एआय – १७१ या विमानाचा अपघात…!

Spread the love

अहमदाबाद: आज दुपारी एअर इंडिया चे बोईंग एआय – १७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचे इंजिन फेल झाले. हे विमान अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता निघालेले हे विमान बोईंग ७८७-८ विमान होते ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. इंजिन फेल झाल्यावर पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, परंतू विमान एवढ्या कमी उंचीवर होते की पायलटही काही करू शकले नाहीत आणि विमान झाडांवर आदळले व मोठा अपघात झाला. इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. इमारतींच्या परिसरातील वाहने जळून खाक झाली आहेत. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.

 

विमानाचा पाठीमागचा भाग खाली झुकल्याने तो प्रथम झाडांवर आणि नंतर इमारतीच्या छतावर आदळला. यामुळे विमानाला आग लागली. नेमका अपघात कसा झाला? आणि त्याचे कारण काय? याची माहिती मिळणार आहे.

 

या विमानामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.


Spread the love

Related posts

कळसुलकर हायस्कूलच्या सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर कोरले आपले नाव.

news

चतुर्थीत चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ३०७ एसटी बस सोडणार!

news

“शब्दांच्या पलीकडले “ब्रेल लिपीतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा..! स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी,मंडणगड , यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम.

प्रसाद परब

Leave a Comment