Uncategorized

जनतेच्या ‘डिजिटल डेटा’चा अपवापर करणार्‍या संस्थांना ५० ते २५० कोटी रुपयांपर्यंत होणार दंड !

Spread the love

लोकसभेत ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण’ विधेयक संमत !

८ ऑगस्ट वार्ता: मणीपूरमधील हिंसाचारावर लोकसभेत चालू असलेल्या गोंधळातच आवाजी मतदानावर ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण’ विधेयक संमत करण्यात आले. या विधेयकानुसार जनतेचा वैयक्तिक डिजिटल डेटा चोरल्याचे अथवा त्याचा अपवापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेला ५० ते २५० कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. या वेळी वैष्णव म्हणाले की, हे विधेयक भारतीय नागरिकांच्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार असल्याचे घोषित केल्यानंतर ६ वर्षांनी हे विधेयक संमत करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

गोवा-बागा – कळंगुट येथे मतिमंद महिलेवरसामूहिक बलात्कार, ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपासात अडथळे…

news

मालवण शहरातील युवकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

news

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने कलंबिस्त रणस्तंभ येते कारगिल विजय दिन साजरा.

news

Leave a Comment