स्टोरी

जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरावस्था!

Spread the love

४ ऑगस्ट वार्ता: जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर सतत दरड कोसळत असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना धोका आहे हे नाकारता येणार नाही.

रस्त्यावर पडलेली दरड

तसेच जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत आसोली गावचे उपसरपंच श्री. संकेत धुरी आणि सदस्य श्री. स्वप्नील गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणच्या परिस्थितीची, रस्त्याची तात्काळ पहाणी करावी असे निवेदन दिले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन
जोसोली फणसखोल येथील दुरावस्था झालेला रस्ता

जोसोली फणसखोल या रस्त्यावर संरक्षक भिंतीची खूप गरज आहे. कारण या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊसामध्ये डोंगराची माती रस्त्यावर येते आणि त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीस बंद होण्याची परिस्थिती निर्माण होते. या वर्षी सुद्धा तीन ठिकाणी मातीचे ढीग आणि त्याबरोबर डोंगरातील झाडे ही रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना प्रवाश्यांना त्रास तर होत आहेच पण जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्याच बरोबर या रस्त्यावरून फणसखोल येथून पुढील शिक्षणासाठी आसोली हायस्कूल मध्ये जाणारी मुलं ही याच रस्त्याने जात असतात. त्यामुळे कोणतीही जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रशासकिय अधिकारी आणि सरकारने या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन या रस्त्याचे तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच जोसोली फणसखोल हा रस्ता लोकांना सोईस्कर आहे की घातक आहे? असा प्रश्नहि उपस्थित होत आहे.


Spread the love

Related posts

देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात….! मनोज जरांगे पाटलांनी

news

पर्यावरणाशिवाय जगणे अशक्य!

news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन!

news

Leave a Comment