क्राईम

परीक्षा परिषदेच्‍या प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे निलंबित!

Spread the love

२७ जुलै वार्ता: शिक्षण विभागात नोकरी लावण्‍याच्‍या आमिषाने उमेदवारांकडून पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या उपायुक्‍त, तसेच प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे यांना निलंबित केले आहे. फसवणुकीचा गुन्‍हा नोंद झाल्‍यानंतर ५ मासांनी राज्‍यशासनाने ही कारवाई केली. या प्रकरणी दराडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज जिल्‍हा सत्र न्‍यायालयाने फेटाळला होता. शिक्षण आयुक्‍त सुरज मांढरे यांनी सादर केलेल्‍या अहवालाची नोंद घेत राज्‍यशासनाने निलंबनाचा आदेश दिला आहे. शासनाच्‍या पूर्वअनुमतीविना शैलजा दराडे यांना मुख्‍यालय सोडता येणार नाही, तसेच निलंबनाच्‍या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी अथवा व्‍यवसाय करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. अटकपूर्व जामीनासाठी दराडे यांनी उच्‍च न्‍यायालयात अर्ज केला आहे.


Spread the love

Related posts

ठाणे येथील एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद!

news

सायबर गुन्ह्यापासून सावध रहा!वेंगुर्ला पोलिसांचा इशारा….

news

वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनोळखी सौंदर्यवती महिलांचे फेसबुक फ्रेंड request न स्वीकारण्याचे सरकारचे आदेश!

news

Leave a Comment