स्टोरी

अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यानी टोलनाकाच फोडला!

Spread the love

२३ जुलै वार्ता: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली आहे. अमित ठाकरे यांना अर्धा तास थांबवून ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाकाच फोडला आहे.

अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


Spread the love

Related posts

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

news

कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान 

newss

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…!

news

Leave a Comment