स्टोरी

तुळस पलतड येथील त्या धोकादायक दरडी च्या ठिकाणी असलेल्या ४ घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थानांतर

Spread the love

म्हापण येथे ही दरड कोसळली! दोन घरातील सहा जणांना सुरक्षित स्थळी स्थानांतर तहसीलदार ओंकार ओतारी यांची माहिती….

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पलतड येथील त्या धोकादायक दरडी च्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली त्यामुळे तेथे आता धोका नाही. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या दरडीच्या बाजूला असलेल्या चार घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, रात्रीच्या वेळी हे ग्रामस्थ बाजूच्या नातेवाईकांकडे झोपण्यासाठी जात आहेत तर म्हापण येथे ही दरड कोसळली असून तेथील धोकादायक दोन घरातील सहा जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती वेंगुर्ले चे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली काही वर्षांपूर्वी तुळस पलतड येथे एक दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला होता. तो धोका लक्षात घेऊन शासनाने संबंधित दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. दरम्यान इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग प्रशासन अजून सक्रिय झाले असून जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना आपापल्या तालुक्यातील धोकादायक दरडींच्या ठिकाणी पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्लेचे तहसीलदार श्री ओतारी यांनी तुळस पलतड येथील संबंधित धोकादायक ठिकाणी कर्मचाऱ्यांंसमवेत भेट दिली. तेथील नागरिकांशी सुरक्षेबाबत चर्चा करून संभाव्य धोका लक्षात घेऊन चारही कुटुंबांनी सुरक्षित स्थळी राहावे अशा सूचना दिल्या. ग्रामस्थांनीही त्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी राहण्यास सुरुवात केली आहे.

म्हापण येथे आज पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील भागात असलेल्या दोन घरांवर बाजूची दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये मोठी हानी झाली नाही. या बाबत माहिती मिळताच तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे हे सुधा उपस्थित होते. दरम्यान दोन्ही घरातील सहा ग्रामस्थांना सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य जागी हलविण्यात आले. तरी तालुक्यातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी होणार “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा.

news

शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम

news

ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी भेट दिली.

news

Leave a Comment