स्टोरी

राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेशिक्षणमंत्रीवर दर्जेदार शिक्षण मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना २१ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेमध्ये समाविष्ट करण्याविषयीचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.याविषयी अधिक माहिती देतांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यात एकूण ९ सहस्र ३०५ शाळाबाह्य मुले आढळली होती; मात्र त्यांतील ९ सहस्र ४ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले आहेत. यांतील काही मुले विकलांग आहेत, काही ठिकाणी जागेची अडचण असल्यामुळे त्यांना अंगणवाडीमध्ये घेण्यात आलेले नाही. ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्याच्या अंतर्गत मॉडर्न शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !

news

बाल नाट्य महोत्सवाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ.

प्रसाद परब

डासांचं जीवनचक्र थांबवा: शिडवणे आरोग्यसेवक गणेश तेली!

news

Leave a Comment