राजकारण

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Spread the love

१७ जुलै, मुंबई वार्ता: राज्य सरकारवर हल्लाबोल करीत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, हे सरकार असंवैधानिक, कलंकित आहे, त्यामुळे विरोधकांना त्यांच्यासोबत चहा पिण्यात रस नाही. शिंदे सरकार शेतकरी विरोधी, जनता विरोधी आणि विकास विरोधी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
अधिवेशनादरम्यान विरोधकांनी शेतकऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले, खरीप पिकांच्या दुबार पेरणीचे संकट, पीक विमा, बनावट बियाणे, महिलांवरील अत्याचार, कायदा व सुव्यवस्था, शिक्षक भरती, बेकायदेशीर वाळू उत्खनन, मुंबईसह इतर महानगर पालिकांमधील भ्रष्टाचार, ठाणे-पुणे, आपत्तीग्रस्तांना मदतीचा अभाव, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघात, वाढती महागाई यासह अनेक मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस-अजित सरकारला घेरण्याचा घाट घातला जात आहे.
विरोधकांनी सरकारवर आरोप-प्रत्यारोप करताना चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा आतापर्यंतचा विक्रम आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा सभागृहात केली, मात्र त्यांना एक पैसाही दिला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकांनाही रास्त भाव मिळत नाही. राज्यात त्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र ते थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कायदा व सुव्यवस्थाही ढासळत चालली आहे. हे सर्व मुद्दे सभागृहात मांडले जाणार आहेत. लोकांना न्याय मिळावा यासाठी सरकारला सभागृहात घेराव घालणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद तर अजित पवारांना..” NCPचा फॉर्म्युला ठरला!

news

एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? खासदार संजय राऊत

news

विधिमंडळाचे अधिवेशन:सत्ताधारी बिनधास्त, विरोधकांचीच कसोटी

news

Leave a Comment