राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक!

Spread the love

८ जुलै वार्ता: आज शनिवारी गडचिरोली जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती होते. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भराभरून कौतुक केलं. कोणी काहीही बोलत असेल तर त्याला महत्त्व नाही. विकासासाठीच राष्ट्रवादीने युती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आज गडचिरोली जिल्ह्यात रिकाम्या हातानं आलेले नाहीत, तर काहीतरी घेऊन आले आहेत. आम्ही गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद देऊन जिल्ह्याचा गौरव केला. मला खात्री आहे की अत्राम मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करावं असं सूचक वक्तव्य यावेळी अजित पवार यांनी केलं.

शासन मनापासून काम करत आहे, त्यामुळे कार्यकर्त्याने देखील मनापासून साथ द्यावी. सरकार हे जनतेसाठी असतं. शेवटच्या माणसाला सरकारी योजनांचा लाभ मिळावां हेच महायुती सरकारचं लक्ष आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीमध्ये होतोय. मी यात सहभागी झालो याचा आनंद आहे. देशाच्या विकासासाठी मोदी सरकार काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारचं असलं तर चांगलं काम होतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्याने भाजपला नाकारले.

news

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता….चंद्रशेखर बावनकुळे

news

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.

news

Leave a Comment