स्टोरी

समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातात लहान मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू!

Spread the love

३० जून वार्ता: समृध्दी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठान शिवारात उभ्या असलेल्या आयशर गाडीला क्रुझर गाडीने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात लहान मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. आयशर-क्रुझरच्या अपघातानंतर क्रुझरमधील संतोष अशोक राठोड, अवनी संतोष राठोड दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी असलेल्या वर्षा संतोष राठोड वय २७ यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हे तिघेही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. आयशरला क्रुझरने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. अपघातात क्रूझरमधील सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, एका कुटुंबाचा दुर्देवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

डॉक्टर मंगला परब यांच्या वतीने गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

news

।।जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।। १६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव!’

news

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ‘आंतरधर्मीय समिती’ची नियुक्ती!

news

Leave a Comment