स्टोरी

सावंतवाडी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्या न्याय हक्कासाठी लढा कायम…!.

Spread the love

सावंतवाडी: अंगणवाडी कर्मचारी यांना मानधनात वाढ नवीन मोबाईल पेन्शन ग्रॅज्युएटी चारमागण्यासाठी गेले कित्येक दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी शासनाकडे न्याय हक्कासाठी लढत आहेत. पण त्यांच्या मागणीकडे शासन लक्ष देत नाही. आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात सावंतवाडी येथे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धाव घेत आपल्या मागण्या समस्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी व संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गजानन नाटेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालूच आहे. आज पन्नास दिवस झाले. कोल्हापूर भंडारा धाराशिव येथील पाच अंगणवाडी कर्मचारी नोटीस धसक्याने मरण पावले आहेत. आणखीन किती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बळी शासनाला हवा आहे. मागण्यासाठी कृती समितीची तातडीने बैठक बोलवावी व तोडगा काढावा. अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी सावंतवाडी तालुक्याच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे. शोभा सावंत, ऋतिका निबरे, सायली सावंत, श्रावणी हरमलकर, नीलम गाड, स्नेहा कारेवडेकर, अनुराधा गावडे, वैशाली सांगेलकर, रश्मी मिस्त्री,  मंजुषा सावंत, रवीना सावंत, विशाखा सावंत संगीता भोगण, अश्विनी कासार, संजना सावंत यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

 


Spread the love

Related posts

पनवेलमध्ये अश्लील नृत्याचा धुमाकूळ : स्वराज्यभूमीवर अनैतिकतेची साजिश?

प्रसाद परब

श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ कडून कोईळ शाळेला खुर्च्या भेट.

news

शाळेमध्‍ये तंबाखू, मद्य सेवन केल्‍यास त्‍वरित कारवाई !शालेय शिक्षण विभागाचा निर्णय!

news

Leave a Comment