स्टोरी

बिळवस येथे रास्ता खचल्यामुळे परिसर बनला धोकेदायक!

Spread the love

मालवण: बिळवस येथील वरचावडा येथे भाई माधव यांच्या घरालगत रस्ता खचला असून धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली तेथील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.रस्त्यावरून गाड्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत.याची लवकरात लवकर प्रशासनाने व ग्रामपंचायत कार्यालयाने दखल घेतली पाहिजे.बिळवस ग्रामपंचायत विभाजन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी अजूनही बिळवस गावामध्ये कोणताच विकास दिसत नाही योग्य त्या वेळी संवरक्षण भिंत घातली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.सोमवारी बिळवस गावातील युवासेना पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तत्काळ काम करावे यासाठी निवेदन देणार आहेत असे युवासेना विभाग प्रमुख मसुरे राहूल सावंत यांनी सांगितले


Spread the love

Related posts

प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर

news

आडाळी एम‌.आय.डी.सी प्रकल्प सुरू करा! ग्रामस्थांची मागणी.

news

कोमसाप च्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिवस’ उत्साहात साजरा.

news

Leave a Comment