स्टोरी

एकता ग्राम संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): मुणगे येथील एकता ग्राम संघाच्या वतीने दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.एकता ग्राम संघ अंतर्गत मुणगे गावातील दहावी, बारावीच्या परीक्षेत श्री देवी भगवती हायस्कूल आणि कै.वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज मधील उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. आनंद मालाडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे, प्रभाग क्रमांक एक प्रभागसेविका सौ.रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला. एकता ग्रामसंघाचा अध्यक्षा सौ.सविता रूपे, सचिव सौ.आरती सावंत,कोषाध्यक्ष सौ.हर्षदा मुणगेकर, लिपिका सौ.अनुजा कारेकर यांच्या आयोजनातून गुणगौरव सोहळा कार्यक्रमात विद्यार्थी,पालक, गुरुवर्य सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Spread the love

Related posts

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप..

news

भारतीय सैन्यात पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचा आरोप!

news

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!    

news

Leave a Comment