स्टोरी

मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने आयोजन.

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसिक यांनी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यामुळे ही रंगभूमीची सेवा आमच्याकडून अशीच घडत राहो. आई वडीलांचे आशीर्वाद आणि देवी भगवतीची कृपा सदैव पाठीशी राहूदे, असे प्रतिपादन श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे- डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांनी येथे केले.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण प्रकाश लब्दे याना नुकतेच लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश लब्दे यांनी नोबल प्रोट्याकटीव्ह प्रा. लि. आणि श्री ग़ुलाम हुसैन, नोबल फॅमेली यांचे नोकरीत नेहमी सहकार्य लाभत असल्या बद्दल तसेच दशावतार मंडळातील सर्व कलाकारांचे आभार मानले. यावेळी सौ वैशाली पाटिल, लहुकुमार शिंदे, डी. टी. अंबेगावे तसेच सदस्य उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अंतराळ संशोधनासाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात ७ व्या क्रमांकावर!

news

मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सीताराम गावडे सन्मानित

news

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

news

Leave a Comment