स्टोरी

राज्‍यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा!

Spread the love

९ जून वार्ता: वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील २८८ मतदारसंघांमध्‍ये निवडणूक प्रमुखांची नियुक्‍ती भाजपकडून करण्‍यात आली आहे. या सर्व मतदारसंघांत २८८ निवडणूक प्रमुख पूर्णवेळ काम करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यात २०० आमदार निवडून आणण्‍यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्‍याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

कोण कोण निवडणूक प्रमुख?

मुंबई उत्तर – योगेश सागरमुंबई, उत्तर पश्चिम – अमित साटम, मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी, मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड, मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा, ठाणे – विनय सहस्रबुद्धे, मावळ – प्रशांत ठाकूर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार, कोल्हापूर – धनंजय महाडिक, हातकणंगले – सत्यजीत देशमुख, सांगली – दीपक शिंदे, सातारा – अतुल भोसले, सोलापूर – विक्रम देशमुख, माढा- प्रशांत परिचारक, जालना – विजय औताडे, लातूर – दिलीप देशमुख, छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर, दिंडोरी – बाळासाहेब सानप, वर्धा – सुमीत वानखेडे, पुणे – मुरलीधर मोहोळ, बारामती – राहुल कुल, शिरुर – महेश लांडगे.


Spread the love

Related posts

कु. तनया वाडकरचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी मंडळाच्या वतीने सत्कार!

news

सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस प्रवीण सूद यांची नियुक्ती!

news

मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप-परीसर सावंतवाडी येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू!

news

Leave a Comment