स्टोरी

अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो! बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे यशस्वी संशोधन!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अश्‍वगंधा औषधी वनस्पतीच्या रेणूंमुळे (मॉलिक्यूलमुळे) कोरोना विषाणू नष्ट होतात, असे बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे. जगात प्रथमच अश्‍वगंधाच्या रेणूचा कोरोना विषाणूंवर होणार्‍या परिणामांचा अशा प्रकारे यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे. त्याला ‘जर्मन पेटेंट’ही मिळाले आहे. ३ वर्षांच्या अभ्यासानंतर हे यश या शास्त्रज्ञांना मिळाले आहे. अश्‍वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे. सरकारच्या साहाय्याने आता रुग्णांवर चाचणी केली जाईल.संशोधन सहयोगी प्रशांत रंजन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर आतापर्यंत अश्‍वगंधाला अनुसरून कोणतेही संशोधन झालेले नाही. मानवी शरीरातील कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट करण्यात हा अश्‍वगंधाचा रेणू उपयुक्त ठरेल.


Spread the love

Related posts

लठ्ठपणा कमी करण्यासाठी १६ ऑगस्ट पासून योग शिबीराचे आयोजन. 

news

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग चित्रपट सेना अध्यक्षपदी गजेंद्र कोठावळे यांची नियुक्ती.

प्रसाद परब

एकता ग्राम संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार!

news

Leave a Comment