क्राईमस्टोरी

कामोठेतील विनम्र सोशल क्लबमध्ये लाखोंचा जुगार अड्डा? पोलीस कारवाईचा अभाव चिंताजनक

Spread the love

कामोठे | महाराष्ट्र न्यूज : कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनम्र सोशल क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार चालवला जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. लाखो रुपयांच्या सट्टेबाजीचे हे अड्डे नियमित चालू असल्याने स्थानिक युवक आणि कुटुंबे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बरबाद होत असल्याचे समजते.महाराष्ट्र न्यूज आणि डेमोक्रेटिक इंडियन न्यूज या माध्यमांनी वारंवार या प्रकरणाची बातमी दिली असतानाही सिनियर पी.आय. विमल बिडवे यांच्या नेतृत्वाखालील कामोठे पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन छापा टाकावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

अफगाणिस्तानामध्ये प्रतिदिन १६७ मुलांचा होत आहे मृत्यू! तालिबानी सत्तेमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली!

news

मसुरेचा सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेला…! लोणंद येथे वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाण्याचे वाटप.

news

कोकण इतिहास परिषद १३ वे राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्षपदी डॉ. वि. ल. धारूरकर…!

news

Leave a Comment