क्राईम

चिंचपाडा गावात अज्ञात इसमाने पेटवून दिल्या ३ टू व्हीलर आणि १ कोर व्हिलर अशा एकूण ४ गाड्या!

Spread the love

अज्ञात गुन्हेगारा विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – विठ्ठलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील चिंचपाडा गावात १ जुन् च्या रात्री घरासमोर पार्क करून ठेवलेल्या ३ टू व्हिलर तसेच १ फोर व्हिलर अशा एकूण ४ गाड्या अज्ञात इसमाने पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे . या घटनेत चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. या गुन्ह्याची नोंद विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी करीत आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचपाडा गावातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ रहाणारे रिक्षा चालक रंदिप बाबु साकुंखे यांनी आपल्या रहात्या घराच्या तळ मजल्यावर ३१ मे च्या रात्री ३ दुचाकी व १ चार चाकी वाहन पार्क करून ठेवले होते. १ जुन च्या रात्री २ चे सुमारास मोठा आवाज आल्याने साळुंखे यांनी घरा बाहेर येवून पाहिले तर एक चार चाकी वाहनासह ३ दोन चाकी वाहने पेटलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. त्याच बरोबर वॅगनर या चार चाकी वाहनाचा टायर फुटून त्याचा आवाज आल्याचेही त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रारदार व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी अग्निशमन सिलेंडर तसेच पाण्याचा वापर करून त्यांनी गाड्यांना लागलेली आग विझवली तो पर्यंत या चारही वाहनांचे आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्या वाहनांना अज्ञात इसमाने आग लावल्याची तक्रार रिक्षा चालक असलेले रंदिप बाबु साकुंखे यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात २ जुन रोजी दिली असून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात भा . द .वि . ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास विठ्ठलवाडी पोलिसांकडून केला जात आहे .


Spread the love

Related posts

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

news

नवी मुंबईत आर्थिक फसवणुकीचा सुळसुळाट; पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष

प्रसाद परब

ई स्टोअर इंडिया कंपनी विरोधात मालवण पोलीस स्टेशनला शंभरहून अधिक लोकांची तक्रार!

news

Leave a Comment