स्टोरी

मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो! मुंबई पोलीस

Spread the love

२९ मे वार्ता: मुंबईमध्ये २८ मे ते ११ जून २०२३ या कालावधी पर्यंत अचानक पणे कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. पोलिसांच्या आदेश पत्रात म्हटल आहे की, मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसंच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्त खबऱ्यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीव सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान, लग्न समारंभ, शोकसमारंभ, कोऑपरेटिव्ह सोसायट्य-संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह – नाट्यगृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणं यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे.या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे असं जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे. ११ जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहणार आहे.मुंबई शहरातील शांतता टिकून राहणे, मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू या हेतूने हा आदेश जारी करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्याची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.


Spread the love

Related posts

वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेतहि मंजूर.

news

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे! ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

news

नांदेड येथे बस पेटवल्‍याने अंतर्गत बससेवा बंद !

news

Leave a Comment