स्टोरी

२६ मेपासून सुरू हाेणार समृद्धी’चा दुसरा टप्पा! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण

Spread the love

२३ मे वार्ता: नागपूर आणि मुंबईला वेगाने जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा २६ मेपासून खुला होणार आहे. या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यासाठी जंगी तयारी सुरू केली आहे. ‘समृद्धी’च्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर भरवीर ते नागपूर अंतर सहा तासांत पार करणे शक्य होणार आहे. समृद्धीचा तिसरा टप्पा हा भरवीर ते भिवंडी असा आहे. संपूर्ण महामार्ग हा जुलै २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी असल्याने संपूर्ण महामार्ग खुला होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Spread the love

Related posts

२६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान नाशिक येथे चौथ्या “विश्व मराठी संमेलनाचे” आयोजन.

प्रसाद परब

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार!

news

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे म्हणजे माणूसपणाची जाणीव असलेले उत्कृष्ट अधिकारी..! संजय शिंदे

प्रसाद परब

Leave a Comment