स्टोरी

हिरोशिमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

Spread the love

२० मे वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-७ परिषदेसाठी जपान दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी मोदींना या परिषदेसाठी आमंत्रित केले होते. आज शनिवार दि. २० मे रोजी त्यांनी किशिदा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की हिरोशिमाचे नाव ऐकताच आजही जगभरातील लोकांचा थरकाप उडतो. अशा ठिकाणी जी-७ परिषदेच्या निमित्ताने मला महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. सध्या जग क्लायमेट चेंज आणि दहशतवादाशी झगडत आहे. अशा वेळी हा पुतळा जगाला अहिंसेचा संदेश देईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “हा पुतळा हिरोशिमामध्ये स्थापन केला, आणि मला त्याचे अनावरण करण्याच संधी दिली याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो. आपण सर्वांनी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालून, जगाच्या कल्याणासाठी कार्यरत राहणे हीच गांधींना खरी श्रद्धांजली असेल.” असंही मोदी यावेळी म्हणाले.


Spread the love

Related posts

बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता.

news

विश्व हिंदू परिषद इस्रायलच्या पाठीशी आहे…..डॉ. सुरेंद्र जैन

news

‘अजमेर कांड’ हा चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर प्रदर्शित करू! दिग्दर्शक सचिन कदम

news

Leave a Comment