स्टोरी

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक! फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान….

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकमध्ये हिंसाचार आणि निदर्शने चालू आहेत. संपूर्ण देशात अस्थिरता आहे. या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानचा एक कपटी इतिहास आहे; मात्र अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक आहे. पाकमध्ये स्थैर्य असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. बलुचिस्तानमध्ये पुरामुळे मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला स्थिरतेची नितांत गरज आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे…! सत्यवान रेडकर

news

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर.

news

कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खलना विरोधात खोत जुवा बेटावरील महिला आक्रमक.

news

Leave a Comment