स्टोरी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त.

Spread the love

सिंधुदुर्ग: १७ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकार शद्ब वापरल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसैनिक सिध्देश पाटेकर यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिद्धेश पाटेकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. हा केंद्रीय मंत्री राणेंसाठी मोठा दिलासा आहे.


Spread the love

Related posts

कै. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेंतर्गत दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

news

पावशी सर्व्हिस रोड व बस थांब्या संदर्भात महिन्याभरात निर्णय घ्या अन्यथा ठिय्या आंदोलन

news

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

news

Leave a Comment