राजकारण

विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा!

Spread the love

मुबंई : काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले होते. यावरुन काँग्रेस नेते जोरदार आक्रमक झाले आहेत. ज्या सदस्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणा साधला. अशा प्रकारे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन हे चुकीचेच आहे. त्याचे समर्थन मी करत नाही. पण गेल्या सहा महिन्यांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. त्यांना खोके, चोर, मिंधे म्हणणे हे सभागृहाला मान्य आहे का. कारवाईच करायची असेल तर मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे बोलणाऱ्यांवर देखील पहिली कारवाई केली पाहिजे. दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे, असे असे फडणवीस म्हणाले.


Spread the love

Related posts

चाणक्यांची चिंता वाढली! अजून काही आमदार अजित पवार गोटात सामील

news

आंबा,काजू पिकविमा रक्कम न मिळाल्यास १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार…..

news

पोईप विभागात भाजपला धक्का.

news

Leave a Comment