कुडाळ प्रतिनिधी: मोबाईलचे मेसेज वाचणे म्हणजे वाचक नव्हे, तर जोपर्यंत तुम्ही हातात पुस्तकाचं पान हातात घेत नाही आणि ते वाचत नाही तोपर्यंत तुम्ही वाचक नाही. मी गुणवंत आहे, मी यशवंत आहे, मी बुद्धीवंत आहे, हे तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यातून सिद्ध करा. दहावी बारावी झाल्यानंतर मी कुठल्या शाखेत जाणार? हे अगोदर तुम्ही त्या शाखेबद्दलचा परिपूर्ण अभ्यास करा आणि नंतरच तुमचं क्षेत्र निवडा. मग पहा तुमच्या यशाची पहिली पायरी तुम्ही गाठली. हे सिद्ध होईल आणि पुढील जीवनात तुम्ही एक इंटेलिजन्स व्यक्ती म्हणून गणले जाल. असे प्रतिपादन संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी तथा जिल्हा ग्रंथालय संचालक ॲड. संतोष सावंत यांनी केले.

कुडाळ तालुक्यातील गोवेरी ज्ञानदीप वाचनालयच्या वतीने ग्रंथोत्सव व गावातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संवाद तरुण भारत चे प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत तर प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ चे संचालक तथा राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते नगर वाचन मंदिर मालवण चे ग्रंथपाल श्री संजय शिंदे, डॉ. श्री विक्रम आजगेकर ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय संस्थापक अध्यक्ष श्री महेश गावडे, विद्यमान अध्यक्ष श्री सतीश गावडे, उपाध्यक्ष राजू राऊळ, सचिव श्री सूर्यकांत गावडे श्री सत्पुरुष कला क्रीडा मंडळाचे सचिव दीपक गोवेरकर, गुरुनाथ गावडे, सुरज गावडे, जितेंद्र गावडे, दीपेश गोवेरकर, ग्रंथपाल श्री धोंडी गावडे ,श्री प्रदीप जाधव वैभव गावडे पांडुरंग गावडे, शिपाई अनंत गावडेआधी उपस्थित होते.

यावेळी ग्रंथोत्सव चे फीत कापून उद्घाटन ॲड संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावात दहावी व बारावी मध्ये यशस्वी झालेला विद्यार्थ्यांचा फोल्डर व गुलाब व सुपारीचे झाड देऊन सन्मान गौरव करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे यांच्या हस्ते ॲड. संतोष सावंत, संजय शिंदे, विक्रम आजगेकर आदींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲड सावंत पुढे म्हणाले गोवेरी ग्रंथालय हे खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्या सांस्कृतिक साहित्यिक चळवळ व गावच्या विकासाचे केंद्र आहे. या ग्रंथालयाने गावातील प्रत्येक घरात आज वाचक निर्माण केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील काळात हेच विद्यार्थी ही साहित्य चळवळ पुढे नेतील. विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील वाचन करण्यापेक्षा पुस्तकांचे वाचन करून अशा ग्रंथोत्सवाला प्रोत्साहन द्यायला हवे आणि स्वतःची प्रगती करायला हवी. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही शालेय जीवनातच तुम्हाला असे धडे मिळायला हवेत की पुढील काळात तुम्हाला कुठल्या शाखेतून काय बनता येईल. याचे ज्ञान शाळेतच मिळायला हवे. विद्यार्थ्यांनी आता स्वतःही त्यासाठी आपणाला काय बनायचे आहे? याचा अभ्यास पहिल्या टप्प्यात करायलाच हवा मार्गदर्शक सगळेच असतात. पण त्यातील असा मार्गदर्शक शोधा की जो तुम्हाला यशवंततेची वाट सोपी करेल. असे ते म्हणाले.
यावेळी डॉक्टर विक्रम आजगेकर म्हणाले माझे वडील हे पुस्तक वाचायचे म्हणून मी पुस्तक वाचत गेलो आणि घडत गेलो. पुस्तक वाचन हे माणसाला प्रगल्भ बनवते. तुम्ही पुस्तके वाचा तुम्हाला पुढे काय करायचे आहे? हे आताच ठरवा असे ते म्हणाले. यावेळी ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते संजय शिंदे यांनी मार्गदर्शन करताना तुम्ही वाचाल.! तर वाचाल तुम्ही जोपर्यंत पुस्तक वाचत नाही, तोपर्यंत तुमची प्रगती नाही. इथे गुण किती मिळाले यापेक्षा तुम्ही पुढील जीवनात काय करणार आहात? हे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे यांनी केले. जवळपास या वाचनालयात १७०० अधिक पुस्तकांचा संच आहे. पाचशे सभासद आहेत. दरवर्षी वाचनालयातर्फे उपक्रम राबवले जातात गावातील विद्यार्थ्यांच्या प्रोत्सानासाठी आम्ही त्यांच्या यशामध्ये सामील होत त्यांना पुढील जीवनासाठी यशस्वी होण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप मारावी यासाठीच असे उपक्रम आम्ही घेत आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री महेश गावडे, आभार श्री धोंडी गावडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
