स्टोरी

सोशल मीडियावरिल वायरल व्हिडीओमुळे २३ वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस कर्मचारी धनंजय नाईक निलंबित.

Spread the love

संपादकिय✍🏻: सावंतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत माडखोल बीट क्षेत्रात कलंबिस्त (मळ्यात) सुमारे ०५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग LCB पथकाने ख्रिश्चन महिला फातीमा या महिलेच्या घराच्या परिसरात दारूची रेड टाकली होती. त्यावेळी माडखोल बीटचे अंमलदार ASI भागवत हे होते. LCB पथकाची रेड पडताच त्या बीटचे अंमलदार ASI भागवत अत्यंत उद्विग्न झाले आणि त्यांनी पोलीस शिपाई धनंजय नाईक या आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोलीस अधीक्षक साहेबांची नोटीस घेऊन दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी फातिमा हिला वेळोवेळी पोलीस स्टेशनला बोलावूनही ती पोलीस स्टेशनला हजर होत नसल्यामुळे ASI भागवत शिपाई धनंजय नाईक यांनासोबत आरोपी फातिमा हिला नोटीस व समज देण्यासाठी घटनास्थळी पोहचले. संतापाच्या भरात ASI भागवत त्या आरोपीला अत्यंत निर्वाणीचे बोलले. ही घटना होऊन आता पाच वर्षे पूर्ण झाली.

आता पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ASI भागवत यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्या व्हिडीओत ASI भागवत यांनी , “मी तुम्हाला वेळोवेळी पूर्वकल्पना देत आलो होतो” “तुम्ही मला अडचणीत आणले”**”तुम्ही माझ्या रक्ताला तहानलेले असाल तर तुमच्या रक्ताची काय किंमत?” “तुम्हाला आता SP साहेबांसमोर उभे करावे लागणार आहे.” इत्यादी आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत. मात्र त्या व्हिडीओत हवालदार भागवत यांच्यासोबत गेलेले शिपाई धनंजय नाईक हे शांत बसलेले दिसत आहेत. शिपाई धनंजय नाईक फक्त एकदा मान डोलावून काहीतरी पुटपुटतांना दिसत आहेत.ते वाक्य स्पष्ट ऐकूपण येत नाही. सदर घटनेचा कोणत्यातरी धूर्त धोरणी पाताळयंत्री मानवाने व्हिडिओ तयार केला. आणि पाच वर्षांनी आता ०६ जुलै २०२६ रोजी तो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. दरम्यान ASI भागवत हे गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले आणि भागवत यांनी बोलावल्यामुळे त्यांच्यासोबत गेलेले पोलीस कर्मचारी धनंजय नाईक हे सेवेत कार्यरत असल्याने जनप्रक्षोभ निवारणार्थ सिंधुदुर्ग जिल्हाचे मा. पोलीस अधीक्ष डॉ. मोहन दहिकर यांनी त्यांना तडकफडकी सेवेतून निलंबित केले आहे. सादर घटनेची माहिती घेता आणि व्हिडीओ व्यवस्थित पहिला तर पोलीस कर्मचारी धनंजय नाईक यांचा सदर घटनेशी दुरान्वयानेही संबंध दिसत नाही. असं स्पष्ट दिसून येत आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओ पोलीस कर्मचारी धनंजय नाईक पोलीस प्रशासनाला घातक किंवा पोलीस प्रशासनाला लाजस्पद असं वक्तव्य करतांना दिसत नाहीत. फक्त धनंजय नाईक हे आपला वरिष्ठ अंमलदार कायदेशीर कामात मदत मागतो म्हणून ते आपल्या मोटरसायकलने घटनास्थळी दारू धंदेवाल्याला पोलीस अधीक्षक साहेबांनी काढलेली नोटीस बजावणीसाठी त्यांच्यासोबत गेले होते आणि आज पाच वर्षानंतर धनंजय नाईक या प्रकरणात फुकट बळी गेले.

एकंदरीत विचार करता कोणत्याहि बीटातील तथाकथित अवैध धंदयांचे उच्चाटन करण्याची थेट जबाबदारी पोलीस कर्मचारी धनंजय नाईक यांच्यावर नव्हती. माडखोल किंवा अन्य बीटाच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदयांवर छापे टाकण्याचे उत्तरदायित्व लादणे हि बाब सर्वथा गैर व घोर अन्यायकारक आहे. बीटमध्ये अंमलदार भागवत नियुक्त असतांना ते छापे टाकित नाहित, म्हणुन तथाकथीत छापे टाकण्याबाबत कोणत्याहि मा. वरीष्ठांनी हवालदार धनंजय नाईक यांना तसा आदेश दिला नाही. आणि तसे छापे त्यांनी टाकले नाहित. मग असं असतांना हवालदार धनंजय नाईक यांच्यावर सोशल मीडियावर एका प्रसारित झालेल्या अपूर्ण माहितीच्या व्हिडीओमुळे थेट निलंबनाची कारवाई होते. हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकाच नेमणुकितील एका पोलीस अंमलदाराकडे अन्य पोलीस अंमलदाराने कायदेशीर सरकारी कर्तव्यात उचित मदत मागितली तर तशी मदत तात्काळ देण्यासाठी प्रत्येक अंमलदार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६४ तब्दत, महाराष्ट्र पोलीस नियमावली, भाग-३ नियम क्रमांक ५ अन्वये बांधिल असुन मदत करणे हे त्याचे कर्तव्य आहे आणि कर्तव्याला लागूनच धनंजय नाईक यांनी स.पो. फौजदार / ३७७ श्री. भागवत यांना मदत करण्यासाठी कोरोनाच्या प्रतिकुल काळात त्यांच्यासोबत त्यांच्या बीटात गेल्याने त्यांच्याकडून कोणताहि चूक, पोलीस प्रशासनाला लाजस्पद कि गैरवर्तन घडलेलं नाहि. हे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी समजून घेणे गरजेचे होते. मात्र परिस्थिती समजून न घेता तडकाफडकी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पोलीस कर्मचारी धनंजय नाईक यांना निलंबित केलं. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात नाराजीचे वातावरण आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनात गेली २३ वर्षप्रामाणिकपणे, एकनिष्ठ, जबाबदारीने व इनामदारीने काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जर अशी तडकाफडकी कारवाई होत असेल तर अशा प्रमाणितपणाचा काय उपयोग? असा प्रश्न सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात येणं साहजिकच आहे. तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जिल्हातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा आपल्या वरिष्ठांवरच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. तसेच पोलीस कर्मचारी आपण स्वतः असुरक्षित आहोत. कोणत्याहि एखाद्या पत्रकाराने एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला तर आपली नोकरी जाऊ शकते. आपण निलंबित होऊ शकतो आणि विनाकारण आपली चौकशी लागू शकते. फक्त पत्रकाराच्या व्हिडिओचा विचार आपले वरिष्ठ करतील. आपल्या चांगल्या कामाचा आणि आपल्या प्रामाणिकपणाचा विचार पोलीस अधीक्षक किंवा आपले वरिष्ठ करणार नाहीत. असा समज पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होऊ शकतो. या विपरीत व तडकाफडकी निलंबनाच्या कारवाईमुळे गेली २३ वर्ष पोलीस प्रशासनात योग्य प्रकारे आणि प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस कर्मचारी धनंजय नाईक यांचं विनाकारण खच्चीकरण होत आहे. तसेच ही माहिती आता सगळीकडे पसरल्यामुळे धनंजय नाईक यांच्या मित्र परिवारांमध्ये आणि जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे आता जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

टिप: या बातमीच्या माध्यमातून सन्माननीय पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्यावर ताशेरे ओढणे हा उद्देश अजिबात नाही. मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या कारकिर्दीत सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारी विरोधात चाललेले काम अभिमानास्पद आहे. मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी जिल्हातील गुन्हेगारिला आळा घातलेला आहे. हे नाकारता येत नाही. मात्र कळतनकळत एका प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला समाजासमोर मांडणं हा एकमेव उद्देश आहे.


Spread the love

Related posts

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग चित्रपट सेना अध्यक्षपदी गजेंद्र कोठावळे यांची नियुक्ती.

प्रसाद परब

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.

news

राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार…..

news

Leave a Comment