स्टोरी

पोटाची खळगी भरण्यासाठी असं रोज जीवन जगावं लागतं- रवी जाधव.

Spread the love

रवी जाधव✍🏻: सकाळी सात वाजता ग्रामीण भागातून अशा अनेक महिला, वृद्ध महिला सावंतवाडीबाजारपेठेमध्ये येऊन आपला जीव जगण्यासाठी हिवाळा उन्हाळा पावसाळा याची तमा न बाळगता अशा पद्धतीने जीव जगवण्याच सामान मांडून बसतात. समोर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या चार वस्तू दिसत आहे त्या वस्तू विक्री होईपर्यंत दिवस मावळून जातो आणि त्या वस्तू विकून किती मिळतील तर ते फक्त शंभर ते दोनशे रुपये पण पुरे तिला एका दिवसाचा जीव जगवण्यासाठी. तीला ही असतील आजार,टेन्शन अनेक विचार पण ते वृद्ध शरीर अशा अनेक संकटांना तोंड देता देता थकलेलं ते निरागस शरीर विश्रांती घेत असताना मनात एक विचार येतो मग आपण किती सुखी आहोत.

खरंच या जगात मरण खूप सोप आहे...! पण जगणं फार कठीण असं जर कोणाला वाटत असेल तर त्या निरागस वृद्ध आजीक कडे क्षणभर पहा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आजकाल आपण सोशल मीडिया किंवा टीव्ही वर पाहत असालचं काही शहरांमध्ये असेचं जीवन जगणारे काही युवक, तरुण, महिला आणि वृद्ध महिला आपापला जीव जगवण्यासाठी कशा पद्धतीने धडपड करत असताना पालिकेच्या कारवाईत सगळ उद्ध्वस्त होऊन सुद्धा कष्ट करून जीवन जगणे सोडत नाही. कधीतरी मी देखील या व्यवस्थेला बळी पडलो होतो. पण तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादामुळे तरलो. आज अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या व प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणाऱ्या या आपल्या गावातील कष्टकरी निराधार वृद्ध आजींना आमची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान भविष्यात त्यांच्या आधारवड बनून त्यांना सावली देईल हे निश्चित.


Spread the love

Related posts

गोवा पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्या संकुल येथे एकदिवशीय शिवशंभू विचार दर्शन कार्य शाळेचे आयोजन….

news

इंडियन शेअर मार्केट मध्ये काम करून लाखो रुपये कमवा आणि आपली सर्व स्वप्न साकार करा.

news

प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते

news

Leave a Comment