स्टोरी

सावंतवाडी येथील नागरिकांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार…!

Spread the love

मुंबई, ता. ०७: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संबंधित जागेचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने या प्रकल्पाला सात वर्षांपासून विलंब होत होता. याबाबत आता राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले आणि कुमार भोगले यांनी लोकहितासाठी या हॉस्पिटलच्या बांधकामाला आपली कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील नाहरकत प्रतिज्ञापत्र लवकरच न्यायालयात सादर करण्याचेहि त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

आमदार श्री. केसरकर यांच्या मागणीनुसार, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आरोग्य भवन येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची अनेक पदे रिक्त येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरण्याचे कडक आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आता सुधारणार आहे. यासोबतच, तांत्रिक कारणांमुळे गोवा मेडिकल कॉलेज आणि बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये बंद झालेली ‘महात्मा फुले आरोग्यदायी योजना’ पुन्हा सुरू करण्याबाबत आमदार केसरकर यांनी आग्रही मागणी केली आहे. आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी आंबोली, रेडी आणि आचरा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र आणि आयुष वेलनेस क्लिनिक सुरू करण्याच्या प्रस्तावावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद! मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन

news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आले स्वागत.

news

मसुरे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार जाहीर!

news

Leave a Comment