मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात सोमवारी मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या प्रश्नासंदर्भात लढा सुरू केला होता या लढ्याला आता यश आले आहे. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हवामानातील बदल व तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी व कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकलेला नाही. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या प्रकरणांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करावे. हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपचे नेते सतीश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तशी मागणी केली होती त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आलीबैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सुरज मांढरे vc द्वारे, आयुक्त कृषी पुणे vc द्वारे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे vc द्वारे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, वैभव देशपांडे व्यवस्थापक csc, अनिल कुंभारे व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते.
