शिक्षण

कळसुलकर हायस्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी मध्ये क्रांती दिन उत्साहात साजरा

Spread the love

सावंतवाडी: ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आज प्रशालेमध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धा प्रशालेच्या इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन विभागात घेण्यात आलेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री शंकर प्रभू यांच्या गोड मधुरवाणीतून विद्यार्थ्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते भारत मातेला मूर्तीला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रशालेतील ज्येष्ठ इतिहास शिक्षिका श्रीमती मयुरी कदम यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले, या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही.भुरे यांनी ऑगस्ट क्रांती तसेच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्याचे स्मरण केले व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर वृंद यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी परीक्षक म्हणून प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री वरक सर,उच्च माध्यमिकचे श्री उत्तम पाटील सर, श्री शंकर प्रभू सर यांनी काम पाहिले, तर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक गटासाठी आपल्या प्रशालेतील इंग्रजी शिक्षिका श्रीमती एस.जी.सामंत तसेच सांस्कृतिक समिती सदस्य श्री अनिल ठाकूर व उच्च माध्यमिक विभागाचे श्री उत्तम पाटील सर यांनी विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे पुरस्कृत केली होती. संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद यांच्या वतीने मनःपूर्वक त्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल ठाकूर तर आभार श्री दिगंबर सारंग यांनी केले.


Spread the love

Related posts

महाडी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षकांचे नियमबाह्य समायोजन..! गटशिक्षणाधिकारी यांचा मनमर्जी कारभार.

प्रसाद परब

इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा.

news

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ७० युवतींना फॅशन डिजाईनिंगचे मोफत प्रशिक्षण!

news

Leave a Comment