स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिन १ मे रोजी…! रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी: काही वर्षांपूर्वी आमच्या संस्थेचे संस्थापक तथा आमचे मार्गदर्शक कै. आबा उर्फ अनिल परुळेकर यांनी आपल्या संस्थेच्या हक्काच्या रुग्णवाहिकेचे स्वप्न पाहिलं होतं. ते आज सत्यात उतरत आहे. मागील काही दिवसापूर्वी आम्ही ” एक सेवाभावी उपक्रम ” या माध्यमातून समाजबांधवांना या उपक्रमाला हातभार लावण्याचे जाहीर आवाहन केलं होतं. आमच्या या हाकेला प्रतिसाद देत, आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी व समाजातील तळागाळातील संवेदनशील व्यक्तीनी तसेच अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, क्रीडा मंडळ यांनी उदारहस्ते देणगी स्वरूपात भरभरून आर्थिक मदत केली. हजारोंचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. मित्रहो…! आपण रुग्णवाहिकेसाठी केलेली मदत ही केवळ आर्थिक मदत नसून, ती आमच्याकरिता एक जिव्हाळ्याचं नातं आणि माणुसकीच्या स्पर्शाचे प्रतीक आहे. आपल्या या सहकार्यामुळेच अनेक गरजू रुग्ण व अपघातग्रस्त व्यक्तींना वेळेत मदत मिळणार आहे. एखाद्याच्या जीवासाठी धावणारी ही रुग्णवाहिका आता आपल्या सहकार्यामुळे अनेक कुटुंबांना आशेचा किरण ठरेल ही भावनाच आमच्यासाठी फार मोलाची आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सायंकाळी ४:३० ला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी या सेवाभावी उपक्रमासाठी योगदान दिलेल्या दानशूर तसेच नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे. आपण दाखवलेली ही संवेदनशीलता आणि समाजाप्रती आपलं असलेलं प्रेम आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील.

आपल्या सोबतीनं आम्ही विश्वासाचं आणि माणुसकीने भरलेलं एक सुंदर नातं तयार करण्यात यशस्वी ठरलो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सढळहस्ते केलेल्या आर्थिक मदतीबद्दल आमच्या संस्थेच्यावतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

अध्यक्ष, प्रो.सतीश लक्ष्मण बागवे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग.


Spread the love

Related posts

देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे !आर्यन खानला अटक करणारे समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया*

news

महाराष्ट्र शासनाने आपले सरकार या संकेतस्थळा विषयी नागरिकांची अप्रसन्नता

news

स्व. शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण संपन्न..!

news

Leave a Comment