स्टोरी

डॉ. मधुरा सुर्वे ‘एमएच उमन एक्सलेंस २०२६’ पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: युनाय फाउंडेशनतर्फे आयोजित सोहळ्यात कोकण कन्या आणि आयुर्वेदिक चिकित्सक व समाजसेविका डॉ. मधुरा मकरंद सुर्वे यांना ‘एमएच उमन एक्सलेंस २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडला. कोकणकन्या असलेल्या डॉ. सुर्वे गेली १५ वर्षे मुंबईत आयुर्वेदिक क्षेत्रात कार्यरत असून महिलांचे आरोग्य, व्यक्तिमत्व विकास व सामाजिक सक्षमीकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

मावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गरजू, अनाथ व वंचित घटकांसाठी वैद्यकीय सेवा व अन्नदान उपक्रम राबवले आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही आरोग्य विषयक त्यांचे विविध मोफत कार्यक्रम झालेले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्विकारताना डॉ. मधुरा सुर्वे यांनी समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाले परंतु खचून न जाता समाजसेवेचा वसा त्यांनी अखंड चालू ठेवला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यापूर्वी सुद्धा त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत…


Spread the love

Related posts

सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचनिमित्त जिल्ह्यात लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन.

news

बालभारतीच्या पुस्तकातून क्यू.आर्.(QR) कोड वगळला! डिसले गुरूजींची अप्रसन्नता….

news

आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

news

Leave a Comment