स्टोरी

ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र आयकॉन्स समिटमध्ये सिंधुदुर्गच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित “एज्युकेशन आयकॉन्स समिट – २०२६” या भव्य सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली.हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत पुणे येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातील निवडक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, राज्यगीत, ईश्वरस्तवन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रास्ताविक, मान्यवरांचा परिचय तसेच मार्गदर्शनपर भाषणे झाली. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच आदर्श शाळा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आयडॉल शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये कणकवली तालुक्यातील सौ. शिल्पा शिवाजी पवार, वैभववाडी – श्री. चेतन अंबाजी बोडेकर, देवगड – श्री. सचिन लवू धुरी, दोडामार्ग श्री.उदय विठ्ठल गवस, कुडाळ – श्री. मंगेश अनंत बागवे, मालवण – श्री. अशोक भीमराव डोंगळे तसेच वेंगुर्ला – सौ. वैभवी वसंत रायशिरोडकर यांचा समावेश आहे.तसेच आदर्श शाळा पुरस्कार म्हणून पी.एम. श्री जिल्हा परिषद शाळा कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, सावंतवाडी क्रमांक २ या शाळेचा गौरव करण्यात आला.

या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री. तेजस बांदिवडेकर,श्री रणजीत सावंत सर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित “ध्येयतरंग ०.४ – Best of Winner Program” मध्येही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. “Winner of the Year – I Am Winner” या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवण्याचा बहुमानही जिल्ह्याने मिळवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची जाणीव निर्माण करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी देण्यासाठी या परीक्षेचे मोठे योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्यभरातून घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सुमारे १८ लाख २७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे प्रदान करण्यात आली.या सोहळ्याचे आयोजन ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुदाम शेंडगे, सचिव सौ. अर्चना शेंडगे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आयडॉल शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी, उपजिल्हाधिकारी शुभम पवार, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली.शिक्षकांसोबतच प्रज्ञावंत विद्यार्थी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा शोध घेऊन महाराष्ट्र राज्यात एवढ्या मोठ्या स्वरूपात हा सोहळा आयोजित करून संस्था शैक्षणिक व सामाजिक कार्याला चालना देत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. आजचे युग हे ज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धेचे असून भविष्याची गरज ओळखून ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत संपूर्ण महाराष्ट्रात एक शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा प्रेरणादायी व्यासपीठ ठरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत या सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि नवोपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले.या पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळणार असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.


Spread the love

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण.

news

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

news

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

news

Leave a Comment