स्टोरी

असलदे येथील स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे ‘स्वामींचा कौल’ विशेष यात्रा उत्साहात संपन्न..! ६९ भक्तांना अक्कलकोट–पंढरपूर दर्शन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाचे औचित साधून “स्वामींचा कौल” या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या ६९ भाविकांना विविध पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.दिनांक २७ रोजी पहाटे साडेपाच वाजता यात्रेला प्रारंभ झाला असून २९ तारखेला सकाळी सात वाजता यात्रेचा समारोप झाला. या दोन दिवसांच्या भक्तिमय प्रवासात भाविकांनी गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान, श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, श्री स्वामी समर्थ बाळाप्पा महाराज मठ, खंडोबा मंदिर अक्कलकोट, सिद्धेश्वर महादेव मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शन घेतले.या यात्रेदरम्यान सर्व देवस्थानांच्या गाभाऱ्यात ट्रस्टच्या वतीने मानाची शाल व नारळ अर्पण करून भक्तीभाव व्यक्त करण्यात आला. संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

“स्वामींचा कौल” या उपक्रमांतर्गत ज्यांना स्वामी समर्थ महाराजांचे बोलावणे आले, अशा निवडक भाविकांना या यात्रेत सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमामुळे भक्तांमध्ये आनंद, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.यावेळी श्री. सचिन राघो लोके. संस्थापक अध्यक्ष, श्री. प्रशांत बाळकृष्ण साटम – संस्थापक सचिव, सौ. ज्योती जयदीप जाधव- संस्थापक खजिनदार, श्री. प्रकाश तुकाराम जोंईल- विश्वस्त श्री. मधुसूदन सदाशिव भडसाळे- विश्वस्त, श्री. प्रकाश नारायण पावसकर – विश्वस्त,श्री. तात्या भिवा निकम- विश्वस्त, आणि नवीन सभासद सौ कांचन राणे, श्री राजेंद्र पाताडे, सौ तन्वी शिंदे आदी सह स्वामी भक्त उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व.मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

news

शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस!

news

ध्रुवतारा वेलसेन आणि कुंब्रल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर संपन्न!

news

Leave a Comment