कुडाळ प्रतिनिधी: आता मोबाईल फेसबुक तसेच इंस्टाग्राम यासारखे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानानुसार ग्रंथालय बदलायला हवीत. तुमचे प्रश्न काय असतील तर मी ते पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवणार आहे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. कुडाळ श्री महालक्ष्मी हॉल येथे सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. २७ व २८ मार्च या दोन दिवशी उच्च तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव भरवण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता. रा .ब अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळ येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुडाळ हायस्कूल प्राथमिक शाळा तसेच विविध शाळातील विद्यार्थी शिक्षक साहित्यिक ग्रंथ प्रेमी ग्रंथपाल यांनी या दिंडीत सहभाग घेतला. नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ नको, माझे देव मला कळे माझा हात पाय पाहू नको, धनरेषांच्या वयाने तळहातारे फाटला, तेव्हा तुझ्या बी घराचा झरा धनाचा आटला, म्हणे नशिबाचे नऊ ग्रह तळहाताच्या रेघोट्या. बहिणाबाई चौधरींची ही कविता तसेच वाचाल तर वाचाल, अनेक फलक झळकवत ग्रंथोत्सवात दिंडीमध्ये एकच जयघोष करण्यात आला.

चला आपण वाचूया पुस्तके हातात घेऊया. या दिंडी ने सर्व परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर ग्रंथोत्सव चे उद्घाटन दीप प्रज्वलन करून आमदार श्री राणे यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, उप जिल्हाधिकारी सौ आरती देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, देसाई, वाचनालय अध्यक्ष अरविंद शिरसाट, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आधी उपस्थित होते.
यावेळी श्री राणे पुढे म्हणाले ग्रंथालय कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी आता गांभीर्याने घ्यायला हवे वाचन संस्कृती बदलत आहे. या नव्या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आज ग्रंथालय चळवळ अधिक गतिमान होणे गरजेचे आहे. तुमच्या काही समस्या अडचणी आहेत त्या निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन. असे ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी सौ आरती देसाई म्हणाल्या वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. तुम्ही वाचला तर वाचाल त्यामुळे एक तरी पुस्तक वाचायलाच हवे ग्रंथोत्सव हा खरंतर आपल्याला एक नवी ऊर्जा प्रेरणा देत आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ग्रंथ हे खऱ्या अर्थाने विचार समृद्ध करतात. त्यामुळे आपण पुस्तक वाचायला हवे.असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी ग्रंथोत्सव चे महत्व स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ पुढे नेणे फार कठीण झाले आहे. आज ग्रंथालयांना स्वतःच्या हक्काची जागा मिळत नाही. त्यामुळे शासनाने आणि विशेषता आमदार मंत्री महोदय यांनी प्राथमिक शाळा या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळ अधिक गतिमान होईल तसेच ग्रंथालय कर्मचारी यांच्या समस्या अडचणी फार आहेत. त्या शासन दरबारी सुटणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. यावेळी आमदार निलेश राणे व आदी मान्यवरांचा पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे माझी जिल्हाध्यक्ष आनंद वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक पदाधिकारी रुजारियो पिंटो, महेश बोवलेकर, संजय शिंदे, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, भरत गावडे, जयेंद्र तळेकर, कैलास पवार, श्री धाकू तानावडे, रुचिता केळकर, डॉ विवेक पाटणकर, ग्रंथालय कर्मचारी संघाचे महेंद्र पटेल, सुनिता भिसे, बापू सावंत, पुनम नाईक, सिद्धेश राऊळ, अक्षता सावंत आधी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय संघाचे जिल्हा सचिव राजन पांचाळ तर आभार जिल्हा संचालक ॲड संतोष सावंत यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रंथालय चे कर्मचारी व साहित्य उपस्थित होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल देवबाग येथील विद्यार्थ्यांनी दशावतार नाटक सादर करून सर्वांची मने जिंकली. तर दुसऱ्या सत्रात वस्त्रहरणकार कै गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी हेमंत पाटकर, प्रसाद खडपकर, प्रज्ञा चव्हाण, सोनाली गोडे यांनी वस्त्रहरणकार यांचे मालवणी साहित्य हे साता समुद्र पार कसे पोहोचले याचा उलघडा केला. तर श्रुतिका यावर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, डॉ संजीव आके, सौ वर्षा वैद्य यांनी सहभाग घेतला. संपूर्ण दिवसभर आज ग्रंथोत्सव ने कुडाळ नगरी सजून गेली होती.
