स्टोरी

कोलगाव काजर कोंड येथील रस्ता पाणंद खुली करून मिळावी.! सुबोध दाभोलकर

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबर वर रस्त्याची नोंद झाली आहे. असे असताना सदर रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण करण्यास ग्रामपंचायत विभाग का दुर्लक्ष करत आहे? या रस्त्यासाठी निधीही मंजूर झाला. तो परस्पर दुसरीकडे वळवण्यातही आला. यामागे गौड बंगाल काय?कोलगाव धुरीटेंब काजरकोंड असा रस्ता शेत पाणंद कचरा टाकून बंद करण्यात आला आहे. हा रस्ता पाणंद खुली न केल्यामुळे या भागातील लोकांचे हाल होत आहेत. येण्या जाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळ्यात तर या भागात येजा करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी तहसीलदार श्रीधर पाटील व ग्रामपंचायत विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुबोध सुरेश दाभोलकर हे वारंवार करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. त्यामुळे आता त्यांनी जिल्हाधिकारीकार्यालयाकडे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. कोलगाव काजरकोंड विलास गवस ते विठ्ठल आरोस्कर यांच्या घरापर्यंत जाणारी १६० मीटर लांब व सहा फुट रुंदीची पानंद रस्ता ग्रामपंचायत रेकॉर्ड दप्तरी नोंद आहे. हा रस्ता नऊ वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१६ मध्ये नोंद आहे मात्र हा रस्ता कचरा टाकून बंद करण्यात आला आहे ही पानंद खुली करून मिळावी. या मागणीसाठी श्री दाभोलकर वारंवार तगादा लावत आहेत. मात्र याकडे ग्रामपंचायत विभाग दुर्लक्ष करत आहे. सदरच पाणंद रस्ता खुली करून मिळावी. अशी त्यांची मागणी आहे. हा पानंद रस्ता बंद करण्यात आला आहे. तो ये जा करण्यास मुक्त व्हावा. अशी त्यांची मागणी आहे.


Spread the love

Related posts

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य आदर्शवत व दिशादर्शक! अँड. नकुल पार्सेकर

news

पंतप्रधान नरेंद्र मोदिंचे पापुआ न्यू गिनी येथे भव्‍य स्‍वागत

news

आचरा येथील सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांचा ठाकरे गटात प्रवेश….

news

Leave a Comment