स्टोरी

हडपिड श्री स्वामी समर्थ मठ येथे प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ अशा नामजपात श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव स्वामी भक्तांच्या अपूर्व उत्साहात संपन्न झाला. गुरुवारी सायंकाळी तिरुपती बालाजी सत्व वस्तूंचा आगमन सोहळा झाला. श्री पावणादेवी मंदिर हडपीड ते शिरगांव श्री पावणादेवी मंदिर ते निमतवाडी ते श्री स्वामी समर्थ मठ हडपीड अशी मिरवणूक काढण्यात आली.

शुक्रवारी सकाळी गणेश पूजन, पादूका पूजन, अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, तिरुपती बालाजी देखावा दर्शन, उदघाटन सोहळा, लघुरुद्र, कुंकूमार्चन आदी कार्यक्रम झाले. दुपारी पालखी सोहळा,दुपारी महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्री महाप्रसाद, आई पावणादेवी समई नृत्य (किंजवडे), त्यानंतर श्री हरिहरेश्वर नाट्यमंडळ तळवडे – लब्देवाडी हरिहरेश्वर सेवा मंडळ मुंबई ‘रात्रीस खेळ चाले’ नाट्यप्रयोग झाला. उत्सवनिमित्त स्वामींच्या गाभाऱ्यात फळांची व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री. प्रभाकर धाकू राणे, सचिव श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, खजिनदार श्री. ज्ञानेश्वर शां. राऊत, सौ नीलम पेडणेकर, सौ.राणे तसेंच मुंबई व गाव समिती चे सहकार्याबद्दल लाभले.


Spread the love

Related posts

बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

news

आंबोली घाटात अस्वछता करणाऱ्यांना दंड, वनविभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू…!

news

गुरूप्रतिपदेनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

news

Leave a Comment