स्टोरी

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात.

Spread the love

कांदिवली (मुंबई): महिला विकास ट्रस्ट, भारत विकास परिषद (मालाड शाखा), शिवकल्याण केंद्र, सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ व नव नियुक्त महिला नगरसेविकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम कमला विहार स्पोर्ट्स क्लब, महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर मा. ऋतु तावडे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र व नव निर्वाचित नगरसेविकांना शाल व पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. गोपाल शेट्टी (मा. खासदार), मा. विजय (भाई) गिरकर (माजी मंत्री), मा. श्रीराज नायर, मा. एस. एस. गुप्ताजी, प्रभाग समिती अध्यक्षा लीना देहेरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मेहंदी प्रशिक्षण प्रकल्पाचे महापौरांनी विशेष कौतुक केले. अनेक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महिला विकास ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. क्रांती गिरकर-कुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिनू गुप्ता, रेखा गोयल, जीत मिश्रा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते आणि सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love

Related posts

एक दिव्यांग व्यक्ती धावला दिव्यांग भगिनींच्या मदतीला.

news

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरीक्षेत्रात पालट !

news

एअर होस्टेस तरुणीचा संशयास्पद मृत्यू!

news

Leave a Comment