स्टोरी

मुणगे आडबंदर येथे शिमगोत्सवातील कोळीण कलाकारांचा सन्मान..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कोकणातील पारंपारिक संस्कृती जपत अत्यंत उत्साह, आनंदात बालगोपाळांपासून सर्वच जण शिमगासण साजरा करत असतात. मुणगे आडबंदर गावचे पोलीस पाटील श्री. तुषार गोपाळ आडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत शिमग्यात कोळीण वेशभूषा केलेल्या आडबंदर बालकलाकार कुमार हर्ष जोशी, कारिवणे वाडीतील कुमार आर्यन राणे, तसेच आडबंदरचे जेष्ठ कलाकार श्री. शंकर आडकर यांना शाल, रोख पाचशे रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. कोकणच्या शिमगौत्सवतील परंपरा टिकवण्याचे काम असे कलाकार करत आहेत असे पोलीस पाटील तुषार आडकर यावेळी म्हणाले. यावेळी आडबंदर ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेल गळती.

news

गोळवण मध्ये बंद घरास लागली आग!

news

पंतप्रधान सिंधुदुर्गात आले किंवा त्यांनी पाय ठेवला म्हणजे काहीतरी द्यायलाच पाहिजे असं काही नाही….! नारायण राणे….

news

Leave a Comment