सिंधुदुर्ग: तब्बल सात वर्ष एका तरुणाशी प्रेम संबंध ठेवून अचानक त्या तरुणाला न सांगताच एका तरुणीने साखरपुडा करून तरुणाला फसवल्याचीधक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्हात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एकाच गावात राहणारी तरुण तरुणीचे गेली ७ वर्ष प्रेमसंबंध होते. त्यानंतर पुढे लग्न हि करण्याचे ठरले होते. मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहत असतो. गेल्या जानेवारी महिन्यात येत्या मे महिन्यात लग्न करायचे ठरले होते. मात्र त्याआधीच प्रियकराला न सांगताच तरुणीने त्यापेक्षा चांगलं स्थळ मिळाल्यामुळे तात्काळ लग्न ठरवून साखरपुडा हि केला. हि माहिती प्रियकराला समजताच प्रियकराने प्रेयसी फोन करून विचारण्यासाठी फोन केला असता त्या तरुणीने त्याला उडवाउडवी ची उत्तरे दिली. तसेच नंतर कायमचा फोन बंद केला.
त्यानंतर संतापलेल्या तरुणाने त्या तरुणीच्या भावाशी संपर्क केला. गेल्या ७ वर्षात जे काही घडलं ते त्या तरुणाने त्या तरुणीच्या भावाला सांगितलं. मात्र भाऊ उद्धट भाषा बोलू लागला आणि पुरावे मागितले असता त्या तरुणाने काही फोटो आणि व्हिडीओ त्यातरुणीच्या भावाला पाठवले. मात्र त्याचाच गैरफायदा घेऊन भावाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला पोलिसांनी त्या प्रियकराला मुंबई येथून तात्काळ बोलावून घेतले आणि त्याला दम असल्याची माहिती मिळत आहे.
एकंदरीत विचार केला तर त्या पिडीत तरुणाचे कोणी ऐकून न घेता महिलांच्या बाजूने कायदा असतो आणि त्यानुसार त्याला कायदेशीर शिक्षा होऊ शकते. हे दाखवून देत पुन्हा एकदा पुरुष कायद्यापुढे काही करू शकत नाही. तसेच महिलांनासाठी जो कायदा आहे त्याचा काही महिला स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर करत आहेत. हे यातून सिद्ध होते. खरतर आता पुरुषांसाठी पुरुष बचाव समिती आणि योग्य ती कायद्यात तरतूद असणे गरजेचे आहे. हे दिसून येतं.
अशाच प्रेमप्रकारणांमुळे सध्या कित्येक तरुण उध्वस्त होत आहेत. कित्येक मुली तर फक्त पैस्यासाठी लग्न करत आहेत आणि लग्न झाले कि लगेच घटस्फोटची मागणी करत आहेत. तसेच लग्न झाल्यावर एका मुलाला सोडून माहेरी जाऊन राहत आहेत आणि कोर्टात केस दाखल करून महिन्याला हजारो रुपये पोटगी घेत आहेत. एवढंच नाही तर लग्नात स्त्रीला घातलेले दागिने सुद्धा ते स्त्री धन असल्याचा कायदा अमलात असल्यामुळे लाखो रुपयाचे दागिने सुद्धा परत मिळत नाहीत. पोलीस स्टेशन मध्ये गेले असता काही लालची पोलीस महिला सुरक्षाचे कायदे सांगत पुरुषांना हाकलून लावत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे जास्त ते हिंदू धर्मातील मुली, महिला करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील मुलांच्या लग्नाचा आणि लग्न टिकवण्याचा गंभीर प्रश्न सध्या हिंदू धर्मातील पालकांसमोर आहे. याबाबत आता समाजात जनजागृती होणं आणि याबाबत कायदा अमलात येणं हि काळाची गरज आहे.हे नाकारता येणार नाही. तसेच अशा संस्कार नसलेल्यकाही मोजक्या मुलींमुळे हिंदू धर्मातील मुलांची बिकट परिस्थिती येत आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. यापूर्वी कित्येक तरुणांनी मुलींनी फसवल्यामुळे गळफास आणि पॉईजान घेऊन आत्महत्या केल्या आहेत. मात्र कोणी पालक रीतसर तक्रार दाखल करत नसल्यामुळे आणि काही पोलीस कायद्याची चुकीची माहिती आणि कायद्याचा दम देत असल्यामुळे प्रकरणं दाबली जात आहेत. पण अशा शिकारी बुद्धीच्या चतुर महिलांपासून आजच्या तरुणाची रक्षा करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज समाजात दिसत आहे. आज इतर व्यक्ती फक्त अशा प्रकारणाकडे मजा म्हणून बघत आहेत तर काहीजण अशा प्रकारच्या महिलांच्या बाजूने उभे राहत आहेत. मात्र वेळ कोणावरही येऊ शकते याचा विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर हिंदू धर्माला काही महिला घातक ठरल्या आहेत आणि भविष्यात ठरणार आहेत.
( संबंधित प्रकरण पूर्ण माहीत आहे. तसेच कोणत्या पोलीस स्टेशनला घटना घडली हे माहिती आहे. तरीपण बातमीत नाव लपवण्यात आले आहे. कारण संबंधित महिलेवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बातमी सावधगिरी बाळगण्यासाठी प्रसारित करण्यात आली आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
