राजकारण

राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीविरोधात रिट याचिका दाखल होऊ शकत नाही! आमदार रईस शेख.

Spread the love

राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीविरोधात रिट याचिका दाखल होऊ शकत नाही. ही जनहित याचिका होऊ शकते. असे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना सुनावत उच्च न्यायालयाने याचिका योग्य त्या खंडपीठासमोर दाखल करण्यास सांगितले आहे. प्रथमदर्शनी ही याचिका जनहित याचिकेच्या स्वरूपाची आहे. नाव व पत्त्याशिवाय याचिकादाराबाबत याचिकेत काहीही तथ्ये नाहीत. याचिकादाराचा याचिकेतील विषयाशी संबंध नाही. त्यात सार्वजनिक हित असू शकते आणि ते योग्यप्रकारे साधता येऊ शकते. असे न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाहांच्या प्रकारांमध्ये संबंधित महिलांचे रक्षण करण्याचा उद्देश दाखवत स्थापन केलेली आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती ही घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख

श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आंतरधर्मीय विवाह झालेल्या कुटुंबांतील महिलांचे रक्षण व्हावे. त्यांना त्यांच्या तक्रारी व व्यथा मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि कुटुंबातील कलह मिटवण्यास साहाय्य मिळावे. या उद्देशाने महिला व बालविकास विभागाने १३ डिसेंबर २०२२ रोजी अधिसूचना काढत महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समन्वय समिती स्थापन केली आहे. हा निर्णय मुळातच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ (समानतेचा हक्क), अनुच्छेद १५ (भेदभाव करण्यास मज्जाव), अनुच्छेद २१ (खासगी आयुष्याचा हक्क अंतर्भूत असलेला जीवन जगण्याचा हक्क) व अनुच्छेद २५ (धर्म आचरणाचा हक्क) याअन्वये भारतीय नागरिकांना असलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. असा दावा शेख यांनी केला आहे.


Spread the love

Related posts

महाराष्ट्रासाठी २४ तास झोकून काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल! अमृता फडणवीस…

news

अचानकपणे संपातून माघार घेण्‍याची निमंत्रकांची भूमिका अनाकलनीय आणि विश्‍वासघातकी आहे! जुनी पेन्‍शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप.

news

जो काही गैरव्यवहार झाला आहे ‘मातोश्री’मध्ये झाला आहे! मुख्यमंत्री शिंदे.

news

Leave a Comment