स्टोरी

सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

Spread the love

सावंतवाडी (ओटवणे):  सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन असोसिएशनचे इलियास गोम्स, जिल्हा खजिनदार तथा कार्यकारी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, उपाध्यक्ष बॅन्हर परेरा, सदस्या सौ सिल्व्हिया फर्नांडिस, पेरपे दिन फर्नांडिस मीना ग्रीन गोम्स, कु. रेचल डिसोजा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश भिसे, पत्रकार दीपक गावकर, शाळेचे मुख्याध्यापक सागर मेस्त्री, शिक्षिका संगीता सावंत, रेणुका कानसे, रूपाली मर्गज, अंगणवाडी सेविका वर्षा गावकर, मदतनीस सौ कवठणकर आदी उपस्थित होते.

यावेळी अँथोनी डिसोजा यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन असोसिएशनच्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती देऊन अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना लाडू व चॉकलेट्स यांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक सागर मेस्त्री यांनी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेचे आभार मानले. कार्यक्रमातील प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका संगीता सावंत यांनी केले.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील उत्सवाला संतांची वंदनिय उपस्थिती

news

अक्कलकोट ​श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ रोजी गुरुप्रतिपदा उत्सव…!

news

लठ्ठपणा कमी करण्यासाठी १६ ऑगस्ट पासून योग शिबीराचे आयोजन. 

news

Leave a Comment